पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अलिकडे कोण काय करेल याचा भरवसा राहिला नाही आपण इतरांपेक्षा वेगळा फंडा वापरला तर आपण भारी असाच काही महाभागांचा भ्रम असतो असाच काहीसा प्रकार पुरंदर तालुक्यातील सासवड येथे घडला.एका महाभागाने आपल्या खासगी चारचाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा फलक लावून आपली चारचाकी फिरवत होता.परंतु सासवड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत त्याच्यावर सहा हजार पाचशे रुपयांचा दंड बजावला आहे. पोलिसांनी त्याच्या कारवरून लोगोही हटवला आहे. त्यामुळे हा सासवड शहरात यावर एकच चर्चेचा विषय बनला.

पुरंदर तालुक्यात एक कार एक गोलाकार स्टिकर लाऊन फिरत होती. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर कारच्या समोरील बाजूस लावलेले होते.यावर पोलिसांनी त्या कारचा पाठलाग केला परंतु ती कार सापडली नाही परंतु आज सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आमदारकीचे बॅनर लावलेली क्रेटा मोटार दिसली. त्या कारवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते.ही मोटार ताब्यात घेऊन सासवड पोलीस स्टेशनमध्ये आणली तेथे वाहनचालक यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ती कुठल्याच आमदारांची गाडी नसल्याचे समोर आले तसेच वाहतूक नियमांचे अनेक उल्लंघन करण्यात आले होते वाहन चालविण्याचा परवाना देखील नव्हता यावर सहा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

हे प्रकरण दिसत तितक सोप नाही अलिकडे अशी वाहने मोठ्याप्रमाणात रस्त्यावर दिसून येत आहेत यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची,पदाधिकाऱ्यांची वाहने असल्याचा लोगो अथवा फलक आपल्या खाजगी वाहनांवर लावला जातो.यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे कोणत्याही खाजगी वाहनांवर शासकीय कार्यालयाचा फलक नियमबाह्य आहे.याकडेही वाहतूक पोलिसांकडून तपासणी होणे आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *