पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) अवैध धंद्यानी नगररोड गजबजला पुणे शहर पोलिस हद्दीतील लोणीकंद पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चक्क हुक्का पार्लरची हाॕटेल बिनदिक्क्तपणे सुरु असल्याने ग्रामीण भागातील तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असून लोणीकंद पोलिस नुसती बघ्याची भूमिका घेत आहेत बंदी असलेल्या हुक्का पार्लरला नेमका आशीर्वाद कुणाचा यांची जोरदार चर्चा लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गांवामध्ये होत असून अर्थपूर्ण संबधामुळे हुक्का पार्लरवर कारवाई करण्यास पोलिस प्रशासन टाळाटाळ करत आहे की काय अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोर धरत आहे एका हुक्क्याच्या पाॕटची किंमत चारशे ते पाचशे रुपये आहे जसे तरुण येणार त्यांच्या खिशाचा अंदाज घेऊन किंमत लावण्यात हुक्का चालवणार माहिर असतो

    हुक्क्याच्या आहारी महाविद्यालयिन तरुण जात असून यामुळे वेगवेगळ्या आजारला निमंत्रण मिळत आहे त्यामुळे पालक वर्ग मात्र चिंतेत आहे नेमकी हुक्का पार्लरवर कारवाई होणार का याकडे पालक वर्गाचे लक्ष लागून आहे केवळ तुटपुंज कारवाई करुन पुन्हा हा धंदा तेजीत चालतो यामुळे पुणेशहर पोलिसांचा सामाजिक विभाग यावर कारवाईचा बडगा उगारुन हुक्का पार्लर कायमचे बंद करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *