पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्याहून मुंबईला निघालेली बस चालकाचा ताबा सुटल्याने जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एका दरीत कोसळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.यात सात ते आठ जण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप 15 ते 20 प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मदतकार्य युध्द पातळीवर सुरु असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टर्संना देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. खासगी बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव मुंबई येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना ही घटना घडली आहे. ही बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *