थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निवडून आलेले सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ मंडळी यांनी एकमेकांवर कायमस्वरूपी विश्वास अबाधित रहावा यासाठी ग्रामदैवत श्रीमंत काळभैरवनाथ मंदिरात सर्व निर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ मंडळींनी एकत्र बसून सर्वांना ग्रामपंचायत कामकाजात समान संधी देण्याची शपथ घेऊन ही शपथ सार्थ ठरवण्यासाठी गेली दोन वेळेला सरपंच तथा उपसरपंच पदासाठी सदस्यांना संधी उपलब्ध करून दिली हाच लोणी-काळभोर पॅटर्न सध्या हवेली मध्ये चर्चेचा विषय बनत असून यातून गावातील ज्येष्ठांमधील असणारी एकी कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणून याकडे पाहिले जात आहे नुकतेच लोणी काळभोर ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान झालेले योगेश काळभोर यांच्या निवडीनंतर याचा आणखी एक प्रत्यय समोर आला आहे.
लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर यांनी पॅनेल प्रमुखांनी ठरवलेल्या कार्यकाळात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली सरपंच योगेश काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने ते सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेे, यावेळी हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर,विलास काळभोर,सुभाष काळभोर,शिवदास काळभोर,महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर,माजी उपसभापती सनी काळभोर, आण्णासाहेब काळभोर.गाव कामगार तलाठी पद्मिनी मोरे, ग्रामविकास अधिकारी जे एच बोरवणे सर्व ग्रामपंचायत सदश्य व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
बहुचर्चित लोणी-काळभोर पॅटर्न चा अवलंब झाला तर अंतर्गत गटबाजी आणि पैशाचा घोडेबाजार होणारच नाही आणि कलंकरहित स्वच्छ राजकारणाचा एक धोपटमार्ग तयार होईल
