पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] आईने खरेदी केलेल्या जागेवर बांधलेल्या पत्रा शेडची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून घेण्यासाठी मावळ तालुक्यातील खडकाळे कामशेत येथील ग्रामविकास अधिकारी विलास तुकाराम काळे यास दहा हजाराची लाच मागणी व स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
ए.सी.बी.कडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार,मावळ तालुक्यातील खडकाळे कामशेत येथील लोकसेवक ग्रामविकास अधिकारी विलास काळे याने तक्रारदार यांच्या आईने खरेदी केलेल्या जागेवर पत्राशेड बांधकाम केले त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केला त्यावर यासाठी त्याने बारा हजार रुपयाची लाच मागितल्यावर तक्रारदार यांनी याची रितसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली यावर पडताळणी केल्यानंतर आज दहा हजाराची लाच स्वीकारल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले.कामशेत पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
