पुणे (हवेलीनामा गणेश धुमाळ वृत्तविशेष) पुणे शहर भारतात विघेचे माहेर घर म्हणून पुण्याची जगाच्या नकाशावर ओळख आहे देशाच्या तसेच राज्याच्या जडणघडणीत पुण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या शहराचा खासदार आपल्याच पक्षाचा असावा अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते एकेकाळी पुण्यावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते त्यात सुरेश कलमाडी यांच्याशिवाय या शहरात पान देखील हालत नव्हते स्वार्गिय राजीव गांधीचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी या शहराचे खासदार म्हणून अनेक वर्ष काम पाहिले व शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले कालांतराने शरद पवार यांनी राजकीय खेळी करुन सुरेश कलमाडी यांचे राजकारण संपुष्टात आणले आणि पुण्यात कधी नव्हे ते नवख्खा उमेदवार देऊन कलमाडी यांना पराभवाची धूळ चारुन इतिहास रचला आणि विठ्ठल तुपेना पुण्याचा खासदार करण्याची किमया साध्य केली.नंतर अजित पवारांनी महापालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यातून घेण्यासाठी शिवसेनेशी पुण्यात युती करुन आपला पहिला महापौर बसवला आणि तिथून पुढे काँग्रेस पक्षाला पुण्यात घरघर लागली काँग्रेस पक्ष महापालिकेतून बाजूला गेला अनेकांनी राष्ट्रवादी सोबत आपले बस्तान बांधले.पुणे लोकसभा ही कलमाडीकडून गेल्यानंतर विठठल तुपे खासदार झाले पुढे हा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेला आणि कालांतराने पुणे लोकसभा मतदारसंघ बाल्लेकिल्ला झाला आजपर्यंत तो कायम आहे बघता बघता पुणे महानगर पालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवून आपला महापौर बसवला ही किमया केली ती गिरीश बापट यांनी पुण्याचे पालकमंत्री झाले तेव्हाच त्यांनी आपला मनसुबा जाहीर करुन आघाडीची महापालिकेतील सत्ता उलथवून टाकली आणि शहर आपल्या ताब्यात घेतले २०१९च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करीत विजय संपादन करुन उरलेसुरले पुणे त्यांनी भाजपमय केले परंतु प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही त्यामुळे आजाराने त्यांचे निधन झाले त्यामुळे पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला बापटच्या जाण्याने भाजप शहरात पोरकी झाली त्यांच्या जाण्याने स्वपक्षातील तसेच इतर पक्षातील नेत्यानी दुःख व्यक्त केले सहाजिकच स्वर्गिय खासदार बापटांनतंर कोण असा प्रश्न पक्षाला पडला असून पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर नेमकी संधी कोणाला द्यायची यासाठी जोरदार लाॕबिग सुरु आहे. कसबा विधानसभा हा २७वर्षापासून बाल्लेकिल्ला होता पंरतू मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपने टिळक कुटुंबाला तिकिट डावलून हेमत रासने यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडी कडून नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली यात भाजपची पुरती दमछाक झाली अनेक राष्ट्रीय नेते राज्यात भाजपचे सर्वासर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्षरशः तळठोकून बसले होते प्रचारासाठी तोफा धडधडत होत्या रॕली काढून भाजपने वातावरण निर्मिती केली घर टु घर प्रचार केला सामदाम दंड भेद याचा पुरेपुर वापर केला परंतु महाविकास आघाडीच्या एकजूटी पुढे भाजपची धूळदान झाली आणि बारा हजार मतानी धंगेकर विजयी झाले हा पराभवा भाजपसाठी मोठा धक्का तर महाविकास आघाडीची एकी मजबूत करुन तीन पक्ष एकत्र येऊन एकजूटीने जर निवडणूका लढले तर भाजपचे अनेक बाल्लेकिल्ले उध्वस्त होऊ शकतात याची छोटीसी झलक होती व महाविकास आघाडीचे मनोधेर्य वाढवणारी होती त्यामुळे भाजप पुढे लोकसभेला उमेदवार निवडताना आता मोठी आवाहाने उभी आहे दिवंगत खासदार बापट यांच्या जागेवर कोण असा प्रश्न पडला आहे त्याच भाजपमध्ये काही नावांची चर्चा सुरु आहे यात बापट यांची सून स्वरदा बापट,पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ,शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक,माजी आमदार मेधा कुलकर्णी,राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत यात देवेंद्र फडवीस यांचे अत्यंत विश्वासू असलेले माहोळ यांचे नाव आघाडीवर आहे परंतु बापट कुटुंबात जर उमेदवारी दिली नाही तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत जे झाले त्याची पुनरावृत्ती होईल यामुळे भाजप धास्तावली आहे स्वरदा बापट यांची पोटीकोरी असून सहानभूती तसेच बापटांच्या कार्यकत्यांची मोठ्या फौजफाट्यामुळे भाजप पोटनिवडणूकीत सहज विजयी होईल किंवा बापटांच्या सूनेला उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल शक्यतो बिनविरोधच होईल कारण बापट यांचे सर्वच राजकीय पक्षाशी व्यक्तीगत संबंध होते याचा फायदा भाजपाला होईल परंतु उमेदवार बदलला तर मात्र काँग्रेसकडून विद्यामन आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी यांची नावे चर्चेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेव नाव आघाडीवर असून राज्याचे विरोधी पक्षनेते आजित पवार यांचे अत्यंत विश्वासू माजी महापौर प्रशांत जगताप यांचे नाव आघाडीवर आहे.जगताप यांचा राजकारणातील आलेख देखील वाखण्याजोग आहे अतिशय शांत मित्तभाषी मुरबी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे पुणे शहरात त्यांचे राष्ट्रवादी कडून बॕनर लागल्याने जोरदार चर्चा सुरु आहे जगताप यांची राजकारणाची सुरुवात २०२०ला पक्षाचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळली २०१२ला पक्षाने त्यांना नगरसेवक पदाचे तिकिट दिले आणि ते निवडून आले त्यांना पीएमपीएलचे संचालक पद मिळाले २०१६/१७ला ते पुण्याच्या महापौरपदी विराजमान होऊन त्यांनी पुण्याचा कारभार हाकला २०१९च्या विधानसभेच्या निवडणूकीत ते हडपसर विधानसभा मतदार संघातून इच्छूक होते त्यांची उमेदवारीही जवपास निश्चित होती पंरतू ऐनवेळेस हडपसरचे नगरसेवक तत्कालिन शहर अध्यक्ष चेतन तुपे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि तुपेनी टिळेकरांचा पराभव करत विधानसभा गाठली.पक्षाने जगताप यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्यांनी शहरात महागाई, बेरोजगारी,करवाढ,नदीसुधार प्रकल्प,जुन्या वाड्याची समस्या,पुणे महानगरपालिकेतील भष्ट्राचारावर आवाज उठवत महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधी आंदोलनेकरुन जेरीस आणले रास्तारोको आंदोलन तसेच केंद्र सरकारच्या धोरणा विषयी पुणे शहराचा अध्यक्ष या नात्याने भाजप विरोधी रान उठवले त्यांच्या अनेक आंदोलनाची दखल महापालिकेतील सत्ताधारी पक्षाला विचार करण्यास लावणारी होती त्यामुळे आजित पवार यांच्या गुडबूक मध्ये पुण्यात आपले स्थान पक्के करण्यात त्यांना यश मिळाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.पुणे शहरात गेली अनेक दिवसापासून २०२४ची लढत दोन माजी महापौर मुरलीधर मौहोळ आणि प्रशांत जगताप यांच्यातच होईल असे अनेक राजकीय जाणकार सांगत होते पंरतू दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या आक्स्मिक जाण्याने ही पोटनिवडणूक होणार की स्वरदा बापट यांच्यामुळे बिनविरोध होणार याकडे राजकीय जाणकारचे लक्ष लागून राहिले असून दोन माजी महौपर लढणार की भाजपा बापटच्या सूनेला तिकीट देऊन बिनविरोध निवडणूकीसाठी प्रयत्न करणार हा येणारा काळच ठरविणार आहे पंरतू सध्यातरी भाजपचे मोहोळ विरुध्द राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप अशीच होणार यांची जोरदार चर्चा पुणे शहरात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *