पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] कोरोनाने देशामध्ये पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केरळ, हरियाणा आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून यावर शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत.
