अकोला [हवेलीनामा वृत्तसमुह] अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले.
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी वादळी पाऊस पडत आहे असाच वादळासह अकोल्यात पाऊस पडत होता जोरदार वाऱ्यामुळे एक मोठे झाड मंदिरातील पत्रा शेडवर कोसळले यात 40 ते 50 जण दबले गेले
