पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर करुन हवेली तालुक्यातील लोणीकंद या जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. संबंधित महिला १२ वी पास देखील नसताना १६ वर्षांपासून शिक्षिकेची नोकरी करीत असलेल्या संगीता दत्तात्रय झुरंगे (रा. लोणीकंद) या महिलेने आतापर्यंत शासनाची तब्बल ४० लाख ६२ हजार ८०६ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. संगीता झुरंगे लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या उपशिक्षिका आहेत. त्या अकरावी उत्तीर्ण आहेत. मात्र त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करुन जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळवल्याची तक्रार शिक्षण विभागाकडून केली आहे. या तक्रारीची शिक्षण विभागाने चौकशी केली आहे.

या चौकशीत संगीता यांची बहीण बारावी उत्तीर्ण झाली आहे तिचे नाव व शैक्षणिक कागदपत्रांचा वापर करून झुरंगे यांनी डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेत शिक्षिकेची नोकरी मिळवली. त्यासाठी त्यांनी राजपत्रामध्ये नाव व पत्त्यामध्ये बदल करून घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर करून डी. एड. अभ्यासकम पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळवल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार लोणीकंद पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *