पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडळामध्ये दर्जेदार कामगिरी करत कुंजीरवाडी शाखेचा पहिला क्रमांक आल्याबद्दल शाखा अभियंता बागवान यांचा मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.कुंजीरवाडी शाखेने मार्च महिन्यात वसुलीच्या 113 टक्के महसूल वसूल करून हा क्रमांक पटकावला आहे. रास्तापेठ येथे आयोजित वार्षिक आढावा बैठकीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या बैठकीला पुणे परिमंडलातील उत्कृष्ट ग्राहकसेवा, महसूलवाढ व वसूली कार्यक्षमतेत गेल्या वर्षभरात सातत्याने सांघिकपणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांतील अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व सांघिक प्रमाणपत्र देऊन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, प्रकाश राऊत, डॉ. सुरेश वानखेडे, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची उपस्थित होते.

यावेळी मुख्य अभियंता पवार म्हणाले की, यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे परिमंडलातील वीजहानी कमी करण्यासोबतच बिलांमधून पुणे परिमंडल थकबाकीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात अचूक बिलिंग, थकीत वीजबिलांची वसूली, महसूलवाढीच्या विविध उपाययोजना, वीजचोरीविरुद्ध कठोर कारवाई आणि तत्पर ग्राहकसेवा या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.पुणे परिमंडल अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात विविध निकषांच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या कार्यालयांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे: मंडल कार्यालय- रास्तापेठ मंडल व गणेशखिंड मंडल विभाग कार्यालय- गणेशखिंड मंडल अंतर्गत पिंपरी विभाग व शिवाजीनगर विभाग, पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी विभाग व राजगुरुनगर विभाग, रास्ता पेठ मंडल अंतर्गत पद्मावती विभाग व नगररोड विभाग. उपविभाग कार्यालय- गणेशखिंड मंडल अंतर्गत चिंचवड उपविभाग व सांगवी उपविभाग, रास्तापेठ मंडल अंतर्गत फायरब्रिगेड उपविभाग व मार्केटयार्ड उपविभाग आणि पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी उपविभाग व उरुळी कांचन उपविभाग. शाखा कार्यालय – गणेशखिंड मंडल अंतर्गत रामबाग कॉलनी शाखा व देहू गाव शाखा, रास्तापेठ मंडल अंतर्गत गुरुनानक शाखा व सोमवार पेठ शाखा तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत कुंजीरवाडी शाखा व वेल्हा दोन शाखा कार्यालय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले. यावेळी परिमंडलातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *