पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] ससून रुग्णालयातील भौतिकोपचार तज्ञ यांनी तक्रारदाराला अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी 60 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना आज रंगेहात पकडले व त्यांच्याविरुद्ध पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार पुणे शहरातील सर्वोपचार रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या ससून रुग्णालयातील भौतिकोपचार तज्ञ डॉ. पवन शिरसाठ यांनी तक्रारदारांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र (disable certificate) देण्यासाठी साठ हजार रुपयाची लाच मागितली त्यांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या विभागाकडे अर्ज केला होता यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज डॉक्टर पवन शिरसाट यांनी तक्रारदाराकडून 60 हजाराची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले व त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई लाचलोत्पात प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास लाच लूतपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत
