पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] चालकाने परस्पर कर्नाटकात घेऊन गेलेली मोटार परत मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे पन्नास हजाराची लाच मागितल्या प्रकरणी पुणे पोलीसातील पोलीस उपनिरीक्षक यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या बदली मोटार चालकाने मालकाच्या संमतीशिवाय मोटार कर्नाटकात घेऊन गेला याविरुद्ध सिंहगड रोड पोलीसात तक्रार दाखल केली ही मोटार परत मिळवून देण्यासाठी लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नारायण पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली याची रितसर तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली यावर या विभागाकडून याची पडताळणी केली असता तडजोड करून वीस हजार रुपयाची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शशिकांत पवार यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली.पुढील तपास पोलीस उपाधिक्षक जयमाला पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *