मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह]

वाळू माफियांवर प्रतिबंध घालण्यासाठी व नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी सुधारित वाळू धोरण तयार करण्यात आले असून, गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. नव्या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्ष सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कमही माफ करण्यात आली आहे.

 

बांधकामांची संख्या वाढत असल्याने वाळूला प्रचंड मागणी असून त्यामुळे या क्षेत्रात बडे माफिया तयार झाले आहेत. हे माफिया प्रशासनालाही जुमानत नाहीत, लोकांना भरमसाट दराने वाळू विकत घ्यावी लागते. त्यामुळे वाळू धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *