मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाकडून यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतला असून सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, पाऊस पडून जे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली. सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झाले तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली त्यामध्ये आणखी बदल केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबद्दलच्या अंतिम निर्णय अवघ्या काही दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *