पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] भिगवण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार यांनी वादातील ट्रॅक्टर सोडवण्यासाठी वीस हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, तक्रारदार यांच्या जमिनीच्या वादातील पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आलेले ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लोकसेवक पोलीस हवालदार रामदास लक्ष्मण जाधव यानी 25 हजाराची लाच मागितली परंतु तडजोडी अंती 20 हजाराची मागणी केल्या प्रकरणी भिगवण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पुढील तपास पोलीस उप अधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *