पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] मृत आईचे सात बारा वरील नाव कमी करण्यासाठी तलाठ्याने दोन हजार रुपयाची लाच मागितली हि लाच त्याचे मदतनीस खाजगी इसम याचे मार्फत स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगीहात पकडले या दोघांवर सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकारानुसार पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या तलाठी नीलम देशमुख यांनी तक्रारदार यांची मृत आई यांचे सातबारा वरील नाव कमी करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली यावर तक्रार यांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दिल्यानंतर याची पडताळणी करून या विभागाने सापळा रचला यात लोकसेवक नीलम मानसिंग देशमुख गाव कामगार तलाठी यांच्यासाठी खाजगी इसम नारायण शेंडकर यांनी ही दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलोचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *