पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शासकीय धोरणाचे डबल स्टॅंडर्ड सध्या अनुभवास येत असून महाराष्ट्रामध्ये गुटखा व पानमसाला यावर बंदी असताना देखील टीव्हीवरील जाहिरातीमध्ये मात्र प्रसिद्ध सिने कलाकार तथा क्रिकेटर च्या माध्यमातून या पान मसाल्याची जोरदार जाहिरात होताना दिसते यातून तरुणांना भुरळ पाडण्याचे काम होत आहे म्हणून नेमके शासनाचे धोरण काय हा प्रश्न यातून अधोरेखित होतो.

तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने सुगंधी पान मसाला तथा गुटक्यावर बंदी घातलेली असून याचा साठा करणे व विक्री करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे असे असताना देखील टीव्हीवरील जाहिरात मात्र या पान मसाल्याच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत विशेष करून सुप्रसिद्ध सिने कलाकार तसेच क्रिकेट मधील स्टार क्रिकेटर या सुगंधी पान मसाल्याच्या जाहिराती करताना दिसत आहेत यामुळे हे क्रिकेटचे सामने पाहणारे तरुण निश्चितच याकडे वळणार मग अशावेळी एका बाजूला बंदी आणि दुसऱ्या बाजूला जाहिरात हे डबल स्टॅंडर्ड सध्या राज्यात अनुभवास येत आहे त्यामुळे राज्य शासनाने अशा जाहिरातींवर देखील बंधने घालून यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

खरे तर या गुटक्यावरील बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत असून सर्वत्र याची विक्री बिन बोबट चालू असून यावर तुरळक आणि तुटपुंजी कारवाई कुठेतरी होताना दिसते अधून मधून एखाद्या साठ्यावर कारवाई होते परंतु याच्या विक्रीत कसलाही बदल होत नाही अगदी छोट्या टपऱ्यांवरती सहज उपलब्ध होणारा गुटखा व पानमसाला सध्या सर्वत्र दिसून येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *