पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अलीकडे भेसळ युक्त पदार्थांच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झाली असून अन्न व औषध प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे कारण अहमदनगर मध्ये एका मोठ्या भेसळयुक्त दूध रॅकेटचा पकडण्यात आले असून यामध्ये हजारो लीडर दूध नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाच्या वतीने अन्न व औषध प्रशासन हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवरती नियंत्रण ठेवत असते परंतु अलीकडे भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार करणे हा एक मोठा व्यवसाय बनला असून याकडे ही खाते किती प्रामाणिकपणे कार्यवाही करते हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून मोठ्या प्रमाणात बर्फ उत्पादन होत आहे यामध्ये वापरले जाणारे पाणी हे कितपत शुद्ध असते याबाबत मोठी साशंकताच आहे.

वेगवेगळ्या भेसळीमध्ये दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यात प्रचंड भेसळ होत आहे परंतु तुटपुंजी यंत्रणा यावर नियंत्रण ठेवण्यात कुचकामी पडत आहेत.

अहमदनगर येथे सौंदर्य प्रसादनापासून चक्क दुध तयार करण्यात येत होते हे रॅकेट अन्न व औषध प्रशासनाने पकडले यात अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून हजारो लिटर दूध जप्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *