पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला यावेळी हजारो भाविकांनी प्रभू श्रीरामाच्य दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दुपारी साडेबारा वाजता प्रभू रामचंद्राचे जन्म सोहळा पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर हे पुणे सोलापूर महामार्गावरील विकसित होणारे उपनगर येथे रामदरा हे रमणीय मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी वर्षभर भाविकांची वर्दळ असते.
आज लोणी-काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ भजनी मंडळ तसेच रामदरा भजनी मंडळाने संतांची अभंग गाऊन वातावरण भक्तिमय केले.
