इंदूर [हवेलीनामा वृत्तसमुह] मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये राम जन्मोत्सवा दरम्यान विहिरीवरील स्लॅब कोसळल्याने 25 जण विहिरीत पडले यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे यामुळे या उत्साहाला गालबोट लागण्याचे वृत्त मध्य प्रदेशातून येत आहे.
आज संपूर्ण देशात प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून वेगवेगळ्या राज्यात याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे वेगवेगळ्या राम मंदिरात भाविकांनी प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे यात मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जमलेले भाविक विहिरीवरील स्लॅब कोसळल्याने विहिरीत पडले या 13 जण ठार झाल्याची माहिती समोर येत असून एकूण 25 जण या विहिरीत पडल्याची माहिती मिळत आहे
