पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) हडपसरमध्ये एका चार वर्षच्या मुलीचा आईनेच चाकूने भोकसून खून केल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात काल रात्री घटना घडली. वैष्णवी महेश वाडेर (वय४वर्ष) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी मुलीची आई कल्पना वाडेर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सिद्धिविनायक दुर्वांकूर सोसायटी ससाणे नगरमध्ये सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या चार वर्षीय मुलीसोबत एकटीच राहत होती.बेकरी उत्पादन विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. यासाठी घरमालक तिथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करुन घेतला होता. घर मालकाने दरवाजा ठोठावूनही महिलेने दरवाजा उघडला नाही. अखेर शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितलं. दरम्यान यानंतर महिलेने दरवाजा उघडला. घरमालक आणि शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं असता मुलीचा मृतदेह आढळून आला. चार वर्षीय चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.त्यांनी तात्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेने नेमकं कोणत्या उद्देशाने हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *