पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांना होत असलेल्या टोल आकारणीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली या पाच तालुक्यांतील स्थानिकांना रहिवासी पुरावा दाखवून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर टोल स्थलांतरासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख व टोल प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली.

खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी २ एप्रिल रोजी करण्यात येणारे जनआंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस राष्ट्रीय राज्य मार्गाने प्रकल्प संचालक संजय कदम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, हवेली प्रांत अधिकारी संजय असवले, भोर प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, तसेच कृती समितीच्या वतीने आमदार संग्राम थोपटे, कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, डॉ. संजय जगताप, भोर काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनावणे, भाजपचे जीवन कोंडे, लहू शेलार, रोहन बाठे, राजेश कदम, स्वप्निल कोंडे, आदित्य बोरगे, दीपक पांगारे आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *