पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह]
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीतील भवरा पूर गावच्या शिवारात टिळेकर वस्ती येथील ओढ्या शेजारी निर्जन स्थळी जंगलामध्ये एक व्यक्ती गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती लोणी-काळभोर पोलीसांना मिळाली, यावर पोलिसांचे एक पथक तयार करून त्याठिकाणी धाड टाकली आणि दारू भट्टीत दारू काढनारा व्यक्ती अरविंद रामलाल राजपूत, वय 54 वर्ष, राहणार दत्तवाडी उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे यास ताब्यात घेतले. त्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू बनवण्यासाठी अंदाजे दोन हजार लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच दारू बनवण्याचे साहित्य असे अंदाजे 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.
बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक नागलोत, देवीकर, पोलिस शिपाई शिरगीरे, कुदळे, पवार, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.
