सोलापूर [हवेलीनामा वृत्तसमुह] शेती व उद्योगांसाठी पाण्याचा पुरवठा करणार्‍या कुपमलिका काही कारणाने बंद पडतात.परंतु केमीकल टाकले की बंद पडलेले कुपमलिका पुन्हा सुरु होतात. हे संशोधन केलेल्या सोलापूरच्या विशाल बगले या तरुणाने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत याची माहिती दिली. गडकरी यांनी त्याच्या संशोधनाचे कौतुक केले.

गावातील शेतकरी तथा ग्रामस्थ पाण्यासाठी कुपमलिकेवर अवलंबून असतात.पण बरेचदा कुपनलिकेचे पाणी बंद होते अथवा कमी पाणी कमी होते ही नेहमी एक मोठी अडचण असते. हे ओळखून सोलापूर येथे राहणारे खनिज अभियंता विशाल बगले यांनी कोरडे बोअरवेल आणि चालू बोअरवेलला पाणी वाढविण्यासाठीचे सोपे व परवडणारे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केले.

गडकरी यांनी या तंत्रज्ञाना बद्दलची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य सरकार यांना पत्र लिहून प्रकल्प राबविण्यासाठी सुचविले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *