पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील निवेदा विभागातील लिपिकास एक लाखाची लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, यातील तक्रारदार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे देखभाल दुरूस्तीचे कामे करतात, त्यांना शासकीय निविदेनुसार काम मिळाले होते. या कामाच्या वर्क ऑर्डरची फाईल तयार करुन संबंधीत विभागाकडे पाठविण्यासाठीचा मोबदला म्हणून लोकसेवक दिलीप आडे यानी १,०५,०००/- रुपयांची (एक लाख पाच हजार रुपये) लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार त्यांनी ला.प्र.वि. पुणे यांच्याकडे दिली. या तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक दिलीप आडे यांनी तक्रारदार यांचेकडे १,०५,०००/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १,००,०००/- रुपयांची (एक लाख रुपये) मागणी करुन ती लाच रक्कम स्वीकारल्यावर लोकसेवक आडे याना ताब्यात घेण्यात आले असून, पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, लाअ. वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *