पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्यातील बहुचर्चित रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त करण्यात आली. यात रोझरी स्कूलची इमारत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे.

विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे घेऊन ही रक्कम नूतनीकरणासाठी न वापरता अपहार केला, अशी फिर्याद बँकेचे अधिकारी शिवाजी काळे यांनी दिली होती. त्यावरून रोझरी स्कूलचे संचालक विनय अऱ्हाना, विवेक अऱ्हाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ‘ईडी’कडून करण्यात येत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *