पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्य कर्मचार्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात राज्यातील प्राथमिक शिक्षकांनीही सहभाग घेतला,जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी संपाचे हत्यार उपसले,दि.14 मार्च पासून हे कर्मचारी संपावर आहेत परंतु आणखी संप मिटलेला नसतानाही यामधील काही सहभागी शिक्षकांनी अचानक शनिवारी शाळा उघडल्या,याची विद्यार्थ्यांना अथवा बहुतेक पालकांना कल्पना नव्हती.यावर काही शिक्षकांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की परिक्षेचा कालावधी जवळ आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आम्ही शाळा चालू केल्या आहेत.
सन 2005 अगोदर सेवेत समाविष्ट असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू आहे तरीही लाभार्थी कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत, यावर काही प्रतिक्रिया अशा आहेत की,आम्हाला संघटनेकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत मग शनिवारी अचानक कामावर परतलेल्या शिक्षकांना या संघटनेकडून सुट दिली की,कामावर परतण्यास सांगितले हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शासनाकडून संपात सहभागी कामगारांवर कारवाई करण्यात येणाची शक्यता असल्याने तसेच शनिवारी कामावर परतल्यानंतर रविवार संपात सहभागी असल्याचे निष्पन्न होणार नाही. बुडणाऱ्या सुट्ट्या हा विषय महत्त्वपूर्ण आहे असे जाणकाराचे मत आहे.
शनिवारी उघडण्यात आलेल्या बहुतेक शाळेत जुनी पेंशन योजना लागू असणारे शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाच जर मुद्दा असेल तर संपात सहभागी होण्या अगोदर याची जाणीव का होऊ नये.
