मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] गेल्या आठवडाभरापासून संपावर असलेल्या राज्य कर्मचारी संघटनेने आज संप मागे घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळत असून सर्व कर्मचारी उद्यापासून कामावर रुजू होतील अशी माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यभरातील जवळपास सर्वच कर्मचारी संपावर गेले त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह शिक्षण विभाग देखील अडचणीत आला ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांना घरी बसण्याची वेळ आली तर आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अवघड झाले. राज्यात एच थ्री एन टू याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तसेच मोसमातील बदलाचा परिणाम झाल्याने अनेक नागरिक ताप सर्दी खोकला याने त्रस्त आहेत गरीब व गरजू रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा मिळत असते परंतु गेले आठवडाभर ही सेवा मिळू शकली नाही त्यामुळे या सर्वसामान्य जनतेवर मोठा आर्थिक बोरदंड पडला याची भरपाई कशी होणार हा तर प्रश्न अनुत्तरीतच राहतो तसेच शालेय विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान हे देखील न भरून येणारेच आहे.

राज्य शासनाने घोषित केलेला आनंदाचा शिधा गुढीपाडव्याच्या दिवशी सण साजरा करण्यासाठी मिळणार होता परंतु संपावर असलेल्या महसूल खात्यातील विशेषतः पुरवठा विभागातील कर्मचारी यामुळे हा शिधा गुढीपाडव्यास मिळणे दुर्लभ झाले आहे तो आता गुढीपाडव्यानंतरच मिळणार एवढे मात्र निश्चित, सण झाल्यानंतर तो साजरा करण्यासाठी मिळणारा शिधा उपलब्ध होणार आहे अशीच सर्वसामान्य ची प्रतिक्रिया येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *