पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अंदाधुंद गोळीबार झाला असून यात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नाही गोळीबारामुळे जिल्ह्यासह पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे संध्याकाळच्या सुमारास गोळीबार झाला आहे. मोरणा ही घटना घडली असून याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस पोहोचले आहेत.राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.गोळीबार करणारा हल्लेखोर मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबारामध्ये एकाने दोघांवर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामध्ये दोन जण ठार झाले आहेत. याचबरोबर संबंधीताने आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. ठाणे शहरातील माजी नगरसेवक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे व्यक्ती म्हणून मदन कदम यांची ओळख आहे.व्यक्तीगत कारणातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरेघर धरणामध्ये लगतच ही घटना घडली आहे. शिद्रुकवाडी येथे गुरेघर धरण परिसरात गोळीबार झाला असून यामुळे पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.
