पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह]
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी द्रुतगती मार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण मोटार अपघात झाला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ७ प्रवासी जखमी झाले आहेत. मोटारीतून एकूण १३ जण प्रवास करत होते. ते शेगावला जात असताना हा अपघात झाला.
राज्यातील मोठा महामार्ग अशी ख्याती असलेल्या समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. औरंगबादहून शेगावला भाविक दर्शनसाठी जात होते. शिवानी पिसा गावावजळ मोटार आली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चालकाचे मोटारीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याकडेच्या कठड्याला धडकली, अशी माहिती बुलढाण्याचे पोलिस अधिकारी सारंग आव्हाड यांनी दिली.या अपघातील सहा मृतांमध्ये एक पुरूष, चार महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमींनाऔरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.
हा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेला आतापर्यंतचा ४० वा अपघात आहे. हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. अपघातानंतर पाऊण तास शासकीय यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर अधिकारी तिथे दाखल झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांनाच दमदाटी केली.
