पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] लोणी-काळभोर पुणे-सोलापूर महामार्गावर बोरकर वस्ती येथे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वारास अज्ञात वाहनचालकाने ठोसरले यात दोघे गंभीर जखमी झाले.पहाटे नेहमीप्रमाणे थेऊरफाटा येथील कुंजीरवाडीतीचे माजी सरपंच सचिन तुपे आपल्या मित्र परिवारानी या दोघांना उपचारासाठी तातडीने उपचारासाठी पाठवले.
पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बोरकर वस्ती परिसरात एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने ठोसरले त्यात दुचाकीवरील सचिन घोरपडे पृथ्वीराजघोरपडे हे दोघेजण गंभीर जखमी झाले रस्त्यावर कोणीही नव्हते त्याच दरम्यान कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे शहर वाहतुकीचे पोलीस हवालदार उमेश ढाकणे राजु गायकवाड प्रमोद तुपे नेहमीप्रमाणे रामदरा येथे गिर्यारोहण करण्यासाठी जात होते त्यावेळी त्यांना हे दोघे जण रस्त्यावर पडलेले दिसले त्यांनी लगेच रुग्णवाहिकेस पाचारण करून त्यांना उपचारासाठी पाठवले.
