संभाजीनगर [हवेलीनामा वृत्तसमूह] छत्रपती संभाजी नगर कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीत चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.

वैजापूर तालुक्यातील काही तरुण कावडीने पाणी घेऊन मढी येथे नेण्यासाठी आले होते त्यातील दोघे नदीत बुडत असल्याने तिघांनी त्यांना वाचण्यासाठी उड्या मारल्या परंतु गोदावरी नदी पात्राची खोली जास्त असल्याने चौघे जण बुडाले तर एक जण कसाबसा काठावर पोहोचला.

बाबासाहेब अशोक गोरे व 35 नागेश दिलीप गोरे वय 20 अक्षय भागीनाथ गोरे वय 20 व शंकर परसनाथ घोडके वय 22 सर्व राहणार पालखेडा तालुका वैजापूर या चौघांचा मृतांमधे समावेश आहे दरम्यान शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले असून आणि तिघांची मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबविले जात आहे हे सर्व चौघे वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी असून गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *