पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास सभासदांनी विरोध दर्शवून केवळ सभासद नियुक्त संचालक मंडळ निवडल्यानंतरच कारखाना चालू करण्या संदर्भात हे संचालक मंडळ निर्णय घेईल असा ठराव आज पार पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला.
यशवंत सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजय गोंदे,सदस्य डी एन पवार,यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. यात सर्वसाधारण सभेने कारखाना भाडेतत्वावर देण्यास विरोध दर्शवला असून तात्काळ निवडणूका लावण्याची मागणी केली लोकनियुक्त संचालक मंडळाच्या वतीने कारखाना चालू करावा असा ठराव झाला हा ठराव जगन्नाथ शेवाळे यांनी मांडला.याला कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश घुले,विकास लवांडे आण्णासाहेब गणपत काळभोर तथाा पाांडुरंग काळे यांनी सभासदांच्या वतीने अनुमोदन दिले.
तसेच या कालावधीत अनेक सभासद मयत झालेले असून त्यांच्या वारसांची नोंद शेतीवरील 7/12 प्रमाणे अर्ज घेऊन करण्याची प्रक्रिया चालू करावी अशी सूचना यावेळी करण्यात आली, वारस नोंदीची प्रक्रिया किचकट न करता सुटसुटीत करावी व तात्काळ वारस नोंदी करावे.तसेच निवडणूकीसाठी खर्चाची तरतूद सभासदांच्या लोक वर्गणीतून करावी. कारखाना
कारखाना पूर्वपदावर यायचा असेल तर सभासदांनी योग्य निर्णय घेऊन पुढे जाण्यासाठीच सर्वसाधारण सभेचे आयोजन 11 मार्च रोजी कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने मयत सभासदांच्या वारसांची नोंद करणे,संचालक मंडळ निवडी संदर्भात चर्चा करणे,गोडाऊन भाड्याने देण्याबद्दल चर्चा करणे,कारखान्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेऊन ते काढण्यासाठी उपाययोजना करणे आदी विषय आजच्या विषय पत्रिकेवर होते.
परंतु लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरच उर्वरित सर्व निर्णय हे संचालक मंडळ घेईल असे ठरले आणि ही सर्वसाधारण सभा आटोपली.
यावेळी यशवंतचे माजी चेअरमन जगन्नाथ शेवाळे, के डी कांचन,व्हाईस चेअरमन माधव काळभोर, सुरेश घुले,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन प्रकाश म्हस्के,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, कामगार अध्यक्ष तात्यासाहेब काळे,विकास लवांडे,माजी संचालक पांडुरंग काळे,देविदास भन्साळी,राहुल काळभोर,प्रताप गायकवाड,राहूल शेवाळे,माणिक गोते,माधव कांचन,आण्णासाहेब काळभोर रयत शेतकरी संघटनेचे रामदास कोतवाल ,हेमंत चौधरी,हिरामण काकडे,अरुण घुले, बाळासाहेब चोरघे,भरत कुंजीर आदी मान्यवर मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
[ महाराष्ट्रातील पाच प्रमुख सहकारी साखर कारखान्यांनी स्वतः संचालक मंडळ नियुक्त करून घेतलेल्या निर्णयानंतर ते कारखाने कसे पुन्हा पूर्वपदावर येऊन फायद्यात चालू झाले याच तत्वावर थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना देखील हे संचालक मंडळ फायद्यात आणून चालून दाखवेल यासाठी यशवंत चे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी येत प्रसिद्धीपत्रक सभासदांना समाज माध्यमातून पोहचवले याचे फायदे विषद केले].
