थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या बारा वर्षापासून धुराडे चालू होण्याच्या प्रतिक्षेत असून आज पर्यंत अनेक आश्वासने मिळूनही पूर्ववत चालू झालेला नाही अनेक बैठका, अनेक पर्याय निघूनही यावर कसलाच तोडगा झाला नाही गेल्या बारा वर्षाच्या कालावधीत कार्य खाण्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस क्षेत्र हळूहळू कमी होत गेले पश्चिम हवेली जवळपास शहरीकरणात बदलत गेली तर पूर्व हवेलीतील हडपसर शेजारील अनेक गावे शहरीकरणात विलीन झाली मग सध्या कारखान्याकडे उपलब्ध क्षेत्रातील ऊस किती शिल्लक आहे याचाही उलगडा होणे आवश्यक आहे.
उद्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे यामध्ये अनेक विषय असले तरीही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कुठला मार्ग यातून निघतो याकडे संपूर्ण हवेलीचे लक्ष लागून आहे. अनेक शेतकरी सभासद उद्या यासाठी या सर्वसाधारण सभेला हजेरी लावणार आहेत यातून काही सभासद आपले विचार मांडून कारखाना कसा चालू करता येईल यावर एकमत होतील का हा यातील महत्त्वाचा प्रश्न असून याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे तर कारखाना चालू होण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका मांडली जावी असा सूर पुढे येत आहे
