पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 17 गावठी पिस्टल व 13 जिवंत काडतुसांसह 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन 7 इसमांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमांमध्ये पिस्टल विक्री करणाऱ्या दोन डिलरचा समावेश असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिस्टल विक्री करणारे डिलर हनुमंत अशोक गोल्हार (वय-24 रा. मु.पो. जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर), प्रदिप विष्णू गायकवाड (वय-25 रा. मु.पो. ढाकणवाडी ता. पाथर्डी मुळ रा. नगर रोड, चहाट फाटा, ता.जि. बीड) पिस्टल विकत घेणारे अरविंद श्रीराम पोटफोडे (वय-38 रा. अमरापुर ता शेगाव जि. अ नगर) शुभम विश्वनाथ गरजे (वय-25 रा. मु.पो. वडुले, ता. नेवासा जि. नगर), ऋषिकेश सुधाकर वाघ (वय-25 रा. मु.पो. सोनई ता. नेवासा), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय-25 रा. मु.पो. खडले परमानंद ता. नेवासा), साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय-21 रा. वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ,सुसगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरामध्ये अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वतीने हद्दीमध्ये गस्तीवर व गुन्हेगार तपासणी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने 25 फेब्रुवारी रोजी पिस्टल विक्री करणारे दोन डिलर हे वाघोली येथील नानाश्री लॉज समोर आल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट सहाच्या पथकाने सपाळा रचून हनुमंत गोल्हार, प्रदिप गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या महिंद्रा कारची झडती घेतली असता 1 गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी कार, पिस्टल व काडतुस जप्त करुन आरोपींवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन अटक केली.
पोलिसांनी आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यात हनुमंत गोल्हार हा ए.पी.एम.सी पोलीस स्टेशन नवी मुंबई येथील दोन कोटी 80 रुपयांच्या दरोड्यातील आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती उघड झाली. तर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे समजले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अनधिकृत पिस्टल विक्री करणारे तसेच त्यांच्याकडून पिस्टल विकत घेणारे अरविंद पोटफोडे, शुभम गरजे, ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांना अटक केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून 13 गावठी पिस्टल 4 काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल असा एकूण 21 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याशिवाय गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाकडून गस्ती दरम्यान बाणेर रोड सिंचन भवन समोरून साहिल चांदेरे उर्फ आतंक याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडून 60 हजार रुपये किमतीची पिस्टल व 2 हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्यावर समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो ज्या ठिकाणी काम करतो त्या गॅरेजमध्ये आणखी तीन पिस्टल व काही काडतुसे लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी सुतारवाडी येथील गॅरेजवर छापा टाकून पिस्टल व काडतुसे जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 4 पिस्टल 9 काडतुसे असा एकूण 2 लाख 49 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवयांमध्ये दोन डिलरसह 7 सराईत गुन्हेगारांना अटक करुन 17 गावठी पिस्टल, 13 जिवंत काडतुसे, एक महिंद्रा कार, मोबाईल असा एकूण 23 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल तसेच
युनिट -1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी, उप-निरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, नितीन मुंडे, मोहीते, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर, अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे, शुभम देसाई, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.
