पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सार्वजनिक शिक्षण विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्याची शैक्षणिक प्रगती काय आहे याचा प्रत्यय नुकत्याच नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या कनाशीतील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी थेट दहावी आणि बारावीच्या गणिताच्या पेपरमध्ये कॉपी करण्याची परवानगी मागितली हे सर्व आश्चर्यचकित करणारे असले तरीही येथील वास्तव हेच दर्शवत आहे कारण या आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना शिकविणारा गणिताचा शिक्षकच गेली अनेक महिन्यांपासून उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे.
शासनाचे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण विभागात संदर्भात असलेले धोरण हे अडचणीचे ठरल्याने बहुतांश विद्यालयांमध्ये शिक्षकांची भरती होऊ शकलेली नाही परिणामी उपलब्ध शिक्षकांवरच शिक्षण सेवा देण्याची वेळ आलेली आहे विशेष करून गणित विज्ञान हे अतिशय महत्त्वाचे विषय शिकविणारे शिक्षक बऱ्याचशा शाळेमध्ये नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे अशाच प्रकारचे हे उदाहरण कनाशी येथील मुलींच्या आश्रम शाळेतील असल्याचे दिसून येते या आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी तब्बल 15 किलोमीटर चालत हा मोर्चा कळवण तालुक्यात कार्यालयापर्यंत काढला आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचीच हट्ट धरला त्यामुळे दृकश्राव्य माध्यमातून प्रकल्प अधिअधिकाऱ्याशीच संवाद साधून बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याची परवानगी मागितली जर कॉपी केली नाही तर आम्ही नक्कीच नापास होणार अशी त्यांनी कैफियत मांडली त्यांना गेली अनेक महिन्यांपासून गणित विषय शिकविणारे शिक्षकच नसल्याने आम्ही परीक्षेत काय लिहिणार असा सवाल त्यांनी केला.
