पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] शासकीय नोंदणी कागदपत्रे गेल्या काही दिवसांपासून बेवारसपणे कार्यालयाच्या बाहेर पडलेली असून याकडे सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक नऊ यांचे दुर्लक्ष असल्याचे प्रकरण समोर येत असून यातील दोषी सह दुय्यम निबंधकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सूर्यवंशी यांनी केली

शासनाच्या विविध कार्यालयामध्ये सर्वसामान्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण कागदांच्या फाईल असतात यांची भविष्यात गरज पडते परंतु याकडे अनेक वेळेला दुर्लक्ष करण्यात येते याचीच प्रचिती सह दुय्यम निबंधक हवेली नऊ येथे पहावयास मिळाली आहे गेल्या दोन दिवसात शहरात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहेच.

सह दुय्यम निबंधक कार्यालयाचा हा अक्षम्य निष्काळजीपणा निदर्शनास येत आहे. खरेदी खताची नोंदणी केलेली कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात त्याचे जतन करणे ही नैतिक जबाबदारी सह दुय्यम निबंधकाची असते जनतेच्या खाजगी मालमत्तेची कागदपत्रे असतात शिवाय शासनाच्या देखरेखी खाली जपावे लागतात अशी असताना गेल्या पंधरा दिवसापासून शासकीय रेकॉर्ड बेवारसपणे कार्यालयाच्या बाहेर ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे अवकाळी पाऊस झाला तर त्यातही दस्त भिजू शकतात याची सर्वस्वी जबाबदारी सह दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांची असून कागदपत्रांमध्ये नागरिकांच्या सण 1991 ते 2001 या वर्षाची मूळ प्रत दस्त आहेत ती जर गाळ झाली तर शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *