थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] नायगाव येथे श्री काळभैरवनाथ मंदिर येथे जागतिक महिला दिन उत्साहाथेऊर त साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुखदा कदम यांनी महिलांच्या आरोग्य वि  षयी विस्तृत माहिती घेऊन याबाबत गांभीर्याने काळजी घेण्याचे आवाहन केले. विविध आजारांचे प्राथमिक लक्षणे कोणती व ते होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना सांगितल्या. डॉक्टर विठ्ठल शेडगे यांनी हृदयविकाराचा झटका आल्यास CPR कसे द्यावे याचे प्रशिक्षण दिले. बँक ऑफ बडोदा येथील राहुल यांनी महिला दिनानिमित्त बँकेच्या विविध योजना व बँकेची कार्यपद्धती समजून सांगितली. कृषी मंडल अधिकारी गुलाब कडलक यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेततळे योजना, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेट बद्दल माहिती सांगितली. कृषी पर्यवेक्षक रामदास डावकर यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, डीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन योजना याबद्दल माहिती दिली. कृषी सहायक महेश सुरडकर यांनी पीक विमा योजना, फळ पिक विमा योजना, अपघात विमा योजना बद्दल माहिती दिली. ग्रामसेवक विद्या भगत  यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रम, आभा कार्ड वाटप, बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी सरपंच जितेंद्र चौधरी, प्रभारी माजी सरपंच राजेंद्र रतन चौधरी, माजी सरपंच गणेश गुलाब चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे, माजी उपसरपंच पल्लवी गायकवाड, माजी सरपंच कल्याणी हगवणे, सदस्य अश्विनी चौधरी, संगीता शेलार, शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्षा कल्याणी गुळूंजकर, माया चौधरी, मनीषा माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक संजय पवार व सर्व शिक्षक वृंद, आंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *