पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) व्यायम करत असताना पैलवानांचा ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ही घटना मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडली. घटनेची महिती पसरताच पैलवानकी क्षेञात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. यामुळे सर्वत्र व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे .पैलवान स्वप्नील पाडाळे (वय ३१) असं मृत पैलवनाचे नाव आहे. आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मारुंजी येथील तालमीत ही घटना घडली. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे (महाराष्ट्र चॅम्पियन) याचे आज आकस्मित निधन झाले. स्वप्निल हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक व्यायाम करताना खाली पडला असता त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता अधिक माहितीनुसार, स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा. स्वप्नीलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *