पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुण्याची रणरागिणी आपल्या दुचाकीवरून निघाली जगप्रवासाला.मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून पुणेरी महिला रमिला लटपटे दुचाकीवरून जगभ्रमंतीसाठी ९ मार्च रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ३६५ दिवसाचा प्रवास करून ८ मार्च २०२४ रोजी पुन्हा भारतात परतणार आहे.
रमिला लटपटे म्हणाली की, जगभ्रमंती मध्ये १२ खंड, २० ते ३० देशातून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या विविध पदार्थांचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार करणार आहे तसेच महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशापर्यंत पोहोचविण्याचाही मानस असल्याचे सांगितले.
रायजिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड अर्थात “रमा” या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. रमिला लटपटे ९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीचा प्रारंभ करणार आहे. या मोहिमेस झेंडा दाखविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, अश्विनी जगताप, सुरेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय महिलांमध्ये साहस, जिद्द आणि चिकाटी यावी हा संदेश देण्यासाठीच या जगभ्रमंतीची आखणी केली असल्याचे रशियाने सांगितले. नुकतीच रमिला लटपटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली होती, या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी देखील मोठ कौतुक केले. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी असून त्या अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात.
