पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) इंदापूर तालूक्यातील काटीगावातील भरतवाडीमध्ये वीज पडून एकाचा जागीच मृत्यू झाला ओंकार दादाराम मोहिते(वय२२) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या शेतामध्ये कामानिमित्त गेला असता हा प्रकार घडला. यासंदर्भात इंदापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वीज पडल्यानंतर इंदापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी त्याला दाखल करण्यात आले; मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्यापासून जवळच अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील एका नारळाच्या झाडावर देखील वीज पडली असून ते झाड जळाले आहे. मयत ओंकारचा टी शर्ट देखील जळालेल्या अवस्थेत मिळून आला. या संदर्भात तुकाराम भिवा मोहिते यांनी यांनी इंदापूर पोलिसात खबर दिली आहे.काटी येथील मोहितेवस्ती येथे राहणाऱ्या दादाराम महादेव मोहिते यांना ओंकार हा एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ओंकार हा पोलीस भरतीची तयारी करत होता.त्याच्या मृत्युची बातमी गावात वार्यासारखी पसरली असता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
