पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणेकरांना सेवा पुरविण्यात येणार्या पी एम पी बस ठेकेदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने याचा प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. ठेकेदार दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
ओलेक्ट्रा, हंसा, ॲंथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी संप पुकारला असून गेल्या ३ महिन्यांची बिले थकल्याने ठेकेदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठेकेदारांच्या संपाचा फटका पुणेकरांना बसणार आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक यामुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जवळपास 1100 बसेस यामुळे धावणार नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांना संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ठेकेदार आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही.
काल दुपार पासून ठेकेदाराकडून संप पुकारण्यात आल्यावर बस गाड्याचे वेळापत्रक कोलमडले.आज आठवड्यातील पहिला दिवस त्यात दहावीची परिक्षा असल्याने व्यवस्थापनावर ताण पडणार आहे.
