पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अतिशय जोखमीच्या व धक्काधक्कीच्या वीज क्षेत्रात 24 तास सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी अविश्रांत सेवा देणारे जनमित्र हे महावितरणचे खरे आधारस्तंभ आहेत ग्राहकाशी थेट संपर्क व संवाद साधून त्यांना तत्परसेवा देणारे जनमित्र हेच खरे प्रकाशदुत आहेत अशा शब्दात पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी जनमित्रांचा गौरव केला त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 4 मार्च हा दिवस “लाईनमन दिन” म्हणून महावितरण सह देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पुण्यातील रास्ता पेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित पुणे परिमंडळाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता पवार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, माधुरी राऊत, गिरीश काटकर, भाऊसाहेब सावंत, मधुकर घुमे, बाळासाहेब हळनोर, मनीष सूर्यवंशी, भागवत थेटे, संजय वाघमारे, माणिक राठोड आदी मान्यवर उपस्थित होते

अत्यावश्यक सार्वजनिक सेवा क्षेत्रात काम करताना थोडा ताण तणाव येणे स्वाभाविकच असते परंतु वीज यंत्रणेमध्ये काम करत असताना जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करून शांतचित्ताने व एकाग्रतेने काम करावे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये असेही पवार यांनी आवाहन केले.

तर यावेळी प्रकाश राऊत म्हणाले की, जनमित्रांनी दिलेल्या ग्राहक सेवेवरच महावितरण ची प्रतिमा अवलंबून आहे ते करत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच महावितरणची मोठी प्रगती झाली आहे याप्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात महिला व पुरुष जनमित्रांचा गौरव करण्यात आला व वीज सुरक्षेची शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटणी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *