पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहरात बस सेवा पुरविणाऱ्या बसमधून महिलांसाठीची काही महिन्यांपासून बंद पडलेला ‘महिलादिनानिमित्त मोफत प्रवास’ हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यानुसार महिलांना आता महिलांसाठीच्या खास ‘तेजस्विनी’बसमध्ये दरमहिन्याच्या 8 तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे.याचा महिला प्रवाशांकडून याचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी पहिल्यांदा महिलादिनानिमित्त हा उपक्रम सुरू केला होता.परंतु,दरम्यानच्या अध्यक्षांनी आणि अधिकाऱ्याकडून या उपक्रमाबाबत उदासिनता अनुभवास मिळाली. याचा परिणाम उत्पन्नावर होत असल्याचे सांगून उपक्रम बंद पडला. त्यामुळे दर महिन्याच्या 8 तारखेला शहरातील महिलांना मिळणारा मोफत प्रवास बंद झाला. सध्याचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी हा उपक्रम पुन्हा सुरू केला असून, त्यामुळे आता महिलांना दर महिन्याच्या 8 तारखेला मोफत प्रवास करता येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात येत्या 8 तारखेपासून शहरात सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
