थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] शाॅर्टकटच्या नादात मद्यधुंद मालमोटार चालकाने घातली गाडी थेऊर मधील अरुंद रस्त्याने परिणामी एका दुचाकीस्वारास केले आडवे सुदैवाने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून दुचाकीचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे कळते.

थेऊर मधील बसस्टॉपवरुन नायगाव कडे जाण्याचा एक छोटा मार्ग आहे यावरुन केवळ हलक्या वाहनांची वर्दळ असते यावरुन मोठे अवजड वाहन जाऊ शकत नाही परंतु आज एका बहाद्दराने दारूच्या नशेत चक्क सिलेंडर वाहतूकीचा ट्रकच या रस्त्यावर आणला. रस्त्यावरुन जाणार्‍या दुचाकीस रस्ताच नसल्याने त्याला चक्क मागच्या चाकाखाली घेतले सुदैवाने त्याला मोठी दुखापत झाली नाही अन्यथा भयंकर प्रसंग ओढवला असता.

इंडेन गॅसचा हा ट्रक शिंदवणे घाटमार्गे नायगाव थेऊर असा चाकणकडे निघाला होता.चालक दारु प्यायलेला असल्याचे उपस्थित गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *