पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे सांगोला एस टी बस प्रवाशांनी अनुभवला तब्बल 70 किलोमीटरचा भयंकर प्रवास कारण बसचा चालक चक्क दारूच्या नशेत बस चालवत होता त्यामुळे सर्वसामान्य जनतेची विश्वासपात्र एस टी देखील जीवघेणी ठरत असल्याचे अलिकडे निदर्शनास येत आहेत.अशा प्रकाराकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कसे वेधले जात नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
आज स्वारगेट हून सांगोल्याकडे निघालेल्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय स्वारगेट बसस्थानकातून बस बाहेर पडताच प्रवाशांना आला.तेथील रस्ता दुभाजकास बस धडकली.पुढे ही बस हेलकावे खातच चालत होती,प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करावयास सुरुवात केली दरम्यान बस निरा येथे पोहोचली बस रस्ता सोडून चालत असल्याचे वाहकाच्या लक्षात आल्यावर त्याने बस चालकास बस थांबवण्यास सांगितले प्रवाशांचा शेवटी जीव भांड्यात पडला.त्यांना पुढील प्रवासासाठी दुसर्या बसमध्ये बसविण्यात आले.
एस टीची गरिमा ही सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे दळणवळणाचे साधन म्हणून आहे परंतु अलिकडे यामध्ये अपघातासह काही बेदरकारपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे याचा परिणाम सुरक्षेवर होत आहे यासाठी शासनाने यावर वेळीच पावले उचलावीत अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.
