पंढरपूर [हवेलीनामा वृत्तसमुह] पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात आमलिका एकादशी निमित्ताने मंदिरात एक टन द्राक्षांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजवण्यात आला होता.परंतु केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने एकच चर्चा सुरु झाली. आज (3 मार्च) सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आणि अर्ध्या तासात एक टन द्राक्षंपैकी एकही मणी देखील शिल्लक राहिला नाही.

आमलिका एकादशीनिमित्त पुण्यातील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शुशोभिकरणासाठी तब्बल एक टन द्राक्षांची सजावट केली होती. परंतु अर्ध्या तासात सर्व द्राक्षे गायब झाल्याने चर्ची सुरु झाली. आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरु करण्यात आले. अर्ध्या तासात एक टन द्राक्षंपैकी एकही मणी शिल्लक राहिला नव्हता. दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षे खाल्ल्याचा दावा केला जात असला तरीही दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षांचे घड कोणी पळवले हा देखील प्रश्न उपस्थित होतोच.

द्राक्षे हा एक साधा फळाचा प्रकार असला तरी मंदिरात घडलेला प्रकार अशोभनीय आहे याची चौकशीची मागणी पुढे येत आहे. ज्या भाविकांनी ही द्राक्ष सजावटीसाठी दिले त्याच्याही भावना या प्रकाराने दुखावल्या असून या प्रकारात नेमके कोण दोषी आहेत याचा शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी मागणी विट्ठल भक्तांनी केली आहे.

पंढरपूर मंदिरात प्रत्येक वेळी आकर्षक सजावट करण्यात येते. हंगामी फळांचा, फुलांचा मंदिर सजावटीस उपयोग करण्यात येतो. महाराष्ट्रातील लाखो वारकर्यांच श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाच्या सजावटीसाठी भाविकांकडून सेवा देण्यात आहे. आज फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी आहे, यालाच आवळ्याची एकादशीची म्हणाले जाते. विठ्ठल भक्तांनी निसर्गाचा सांग वाढवण्यासाठी या एकादशीचे खास महत्व वारकरी संप्रदायात मानले जाते. पुणे आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब शेंडे, पूनम शेंडे आणि सचिन चव्हाण यांनी ही द्राक्ष सजावट केली आहे. हजार किलो द्राक्षांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजवण्यासाठी करण्यात आला होता. सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येत असतात, नानासाहेब पाटील यांनी थेट द्राक्ष आणि फुलांच्या मदतीने आकर्षक सजावट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *