मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] मनसेचे जेष्ठ नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्या हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.देशपांडे आज सकाळी मॉर्निग वॉकला जात असताना यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यावर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या पायाला लागलं आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *