पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] अगोदरच्या काळात गांजाची शेती केली हे ऐकून अनेक जणांना याबद्दल कुतूहल वाटायचे परंतु अलीकडच्या काळात अफूच्या शेतीचे फॅड आपल्याकडेही हळूहळू रुजतय चालल्याचे दिसून येत असून अशा प्रकारची प्रकरणे हळूहळू उघड होत असल्याचे दिसून येत आहेत यावरून परिसरात अशी शेती नक्कीच होत असल्याचे संकेत आहेत कारण गेल्याच आठवड्यात सासवड तालुक्यामध्ये अशाच प्रकारची अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांनी धाड टाकली होती आणि त्यानंतर पुणे शहर अंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलिसांनीही वडकी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या होळकरवाडी परिसरात दोन शेतकऱ्यांना अफूची शेती केल्याप्रकरणी अटक केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अफूची झाडे जप्त करून 11 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी शहरातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याच्या विशेष सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्यानंतर परिमंडल पाच चे उपायुक्त यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्व पोलीस चौकी परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांनी आपल्या परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना विशेष सूचना दिल्या त्यानुसार पथकातील काही अंमलदारांना होळकरवाडी परिसरामध्ये ओढ्यालगत असलेल्या शेतामध्ये काही शेतकरी अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गव्हाच्या शेतामध्ये अफूच्या पिकाचे लागवड केल्याची माहिती मिळाली यांवर त्यांनी आपले वरिष्ठांना याची माहिती दिली वरिष्ठांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करून होळकरवाडी येथील चिमणी तलाव परिसरात असलेल्या गट क्रमांक 180 व 183 यामध्ये गव्हाच्या पिकात अफू या पिकाची लागवड झाल्याचे दिसून आले यावर या पथकाने कारवाई करून अकरा लाख 60 हजार रुपये किमतीच्या 116 किलोग्रॅम वजनाची काफुची 1374 झाडे जप्त केली. याप्रकरणी शेतकरी 1) राजाराम दामोदर होळकर 2)बाळू किसन कटके,पाटील नगर, होळकरवाडी यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलिसांकडून आफुच्या पिकावरील ही पहिलीच कारवाई असून यामुळे नागरिकांमध्ये याबाबत चर्चा रंगत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.
ही कारवाई लोणी-काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस अंमलदार साळुंके, वीर, कुदळे आणि नागापूरे यांनी केली.
