पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली परिसरात अवैध वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या लाॅजवर सामाजिक विभागाकडून कारवाई करत बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (वय २९, रा. आळंदी फाटा, लोणीकंद) आणि प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. वाघमारे याला अटक केली असून, दुसऱ्या गुन्हेगाराचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वाघोली परिसरात उबाळे नगरमधील जयभवानी लॉजवर वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली,यावर पोलिसांनी एक बनावट ग्राहक बनवून याची खात्री केली.असता लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला. यात एका बांगलादेशी तरुणीसह पश्चिम बंगालमधील तीन तरुणींना ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार पीडित तरुणींना हडपसरमधील निरीक्षणगृहात पाठविण्यात आले.

वाघमारे आणि पुजारी यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाघमारे यास लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *